1) छत्रपती शिवराय,छत्रपती संभाजी,छत्रपती राजाराम,जिजाऊ,महाराणी ताराराणी,सईबाई ह्यांच्या इतिहासाचे संशोधन करण्यासाठी जागतिक दर्जाचे संशोधन केंद्र शासनाने सुरु करून तत्कालीन राजकीय सामाजिक सांस्कृतिक धार्मिक व आर्थिक इतिहास संशोधनाला चालना द्यावी.या संशोधन केन्द्रामध्ये सर्व समकालीन साधने व आजपर्यंत विविध भाषेत प्रसिद्ध झालेले साहित्य उपलब्ध व्हावे, मराठा इतिहासात संशोधन करनाऱ्या संशोधकांना राहण्याची व अभ्यासिकेची सोय तसेच संशोधनवृत्त्ती देण्यात यावी या संशोधन केंद्रामार्फत मध्ययुगीन महाराष्ट्राचा प्रमाणित इतिहास तज्ञांनी लिहून प्रकाशित व्हावा म्हणजे खरा इतिहास सर्वांसमोर येईल. हा इतिहास जगातील व भारतातील सर्व प्रमुख भाषांमध्ये भाषांतरीत करून शिवरायांचा व संभाजीराजांचा इतिहास जागतिक पातळीवर जावा. हे संशोधन केंद्र पुणे, औरंगाबाद अथवा नागपूर येथे व्हावे व त्याला भरपूर निधी देण्यात यावा.
२] छत्रपती शिवरायांच्या नावाने रु. २५ लक्षाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जागतिक पातळीवर राजकीय, सामजिक, आर्थिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस अथवा संस्थेस देण्यात यावा.
३] सरस्वती महाल, Library तंजावर येथील सर्व मराठी/ मोडी ऐतिहासिक कागदपत्रांचे फोटो कॉपिंग महाराष्ट्र शासनाने त्वरित करून घ्यावे. आणि यातील महत्वाची कागदपत्रे शासनाने प्रसिद्ध करावीत.
४] प्रमाण मराठीत नसलेले परंतु मराठीच्या बोलीभाषेत असलेले सर्व शब्दांना शब्दकोशात जागा देण्यात यावी. त्यांच्या अर्थान्सह ते प्रसिद्ध करावेत.
५] गोवा राज्याचा आदर्श घेऊन महाराष्ट्र शासनाने शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्रभर प्रबोधनपर व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम व विद्यार्थी यांच्या हितासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करावे.
sir u r doin fabulous job,
ReplyDeletekeep it onn.......
jai jijau,
jai shivrai